पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याची 15 डिसेंबर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाची बिले 3050 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी सांगितले.शेतकऱ्याना दिलेल्या आश्वासना प्रमाणे बिले देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कारखाना बंद असल्यावर ऊस गाळपाची समस्या निर्माण होते.काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन जोपासलेल्या ऊसाला चांगला दर मिळणे तसेच गाळपास गेलेल्या ऊसाची बिले वेळेत मिळणे आवश्यक आहे.खरेतर चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी हे काम केले आहे _ अप्पासाहेब नाईकनवरे ,शेतकरी ,कुरोली.

















