आव्हाणा – दि. २२ रोजी बुधवारी सकाळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आव्हाणा येथे शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदनगरी’ या उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय श्री. रामभाऊ दुधे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माननीय श्रीमती सरलाताई कृष्णा गावंडे यांच्या हस्ते रिबन कापून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या आनंदनगरी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आनंद, सृजनशीलता, सामाजिक जाणीव तसेच शिक्षणाबद्दलची गोडी निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळेचा परिसर रंगीबेरंगी सजावटीने नटला होता. विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमास पंचायत समिती सभापती माननीय श्री. विनोद बापू गावंडे, उपसरपंच माननीय श्री. सुनिलशेठ सरोदे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विष्णू पांढरे, तसेच आजी-माजी सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते श्री. शेनफड तात्या गावंडे, श्री. ईश्वर पांढरे, आव्हाणा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विनीत देशमुख, आत्मानंद विद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, आव्हाणा ग्रामपंचायत कार्यालयाचे आजी-माजी सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध अधिकारी व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशाताई, बचतगटातील महिला, विद्यार्थी-पालक, महिला मंडळी व बालगोपाल यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. आनंदनगरी उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
आभार
अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य
शाळा व्यवस्थापन समिती
मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, आव्हाणा

















