मुदखेड – तालुक्यातील बारड येथील माळ्याच्या मळ्यातील गणपती ग्रामस्थांचे श्रद्धा स्थान बनले असून गणेश जन्मोत्सवानिमित्त भाविकांसाठी भाजी भाकरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला असून ओम ग गणपतये नमः च्या मंत्रात भाविकांनी मनोभावे महापूजा केली.
गावालगत माळ्याच्या मळ्यात पुरातन काळातील श्री गणेश मंदिर आहे . या मंदिराचा ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिरनो उद्धार करण्यात आला आहे . दर चतुर्थीला पंच क्रोषीतील भक्तगण मोठ्या भक्ती भावे दर्शनासाठी येत असतात . या मंदिराची देखभाल कोरबनवाड परिवार यांच्याकडे आहे .
निसर्गरम्य परिसरात भव्य मंदिर उभारण्यात आले आहे . विघ्नहर्ता संस्थेच्या वतीने दर चतुर्थीला भक्तांसाठी महाप्रसाद ठेवला जातो . यानिमित्त भजनी मंडळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील भक्तगण सहभागी झाले होते.
श्री गणेश मंदिरात विघ्नहर्ता संस्थेचे विश्वस्त गंगाधर कोरबनवाड यांच्या हस्ते दूध अभिषेक सामूहिक महापूजा करण्यात आली . या पूजेत कचरू कोरबनवाड, मारुती कोरबनवाड , रामेश्वर कोरबनवाड, मधुकर कोरबनवाड , पुंडलिक कोरबनवाड, सिताराम कोरबनवाड, यांच्या सहकुटुंब परिवाराने मनोभावी पूजा केली .
श्री विघ्नहर्ता मंदिराची कोरबनवाड परिवाराने साफसफाई करून फुलांची सजावट केली होती . यावेळी श्री गणेशाचा नामजप करण्यात आला . पंचक्रोषितील गणेश भक्तांसाठी भाजी भाकरीचा महाप्रसाद ठेवण्यात आला असून मोठ्या संख्येत भक्तांनी लाभ घेतले.
गणेश महोत्सवासाठी सुरेश देशमुख , संजय मालीपाटील , संदीप कोरबनवाड , मुकुंद कोरबनवाड, विलास कोरबनवाड, ज्ञानेश्वर कोरबनवाड , सुनील कोरबनवाड, सखाराम कोरबनवाड, राहुल कोरबनवाड,परमेश्वर कोरबनवाड,दिलीप कोरबनवाड,अनिल कोरबनवाड, अंकुश कोरबनवाड, संतोष कोरबनवाड, साहिल कोरबनवाड, बाळू कोरबनवाड, दत्ता कोरबनवाड , यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.























