Saturday, March 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरमध्ये प्रथमच TEDx Talk  नवविचारांचा जागतिक मंच

तरुण भारतbyतरुण भारत
January 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव (सोलापूर) येथे पहिल्यांदाच TEDxSinhgad COE 2026 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या TEDx Talk चे आयोजन करण्यात आले असल्याचे सिंहगडचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले. 

हा प्रेरणादायी कार्यक्रम शनिवार, 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार असून सोलापूर शहरात प्रथमच TEDx संकल्पनेअंतर्गत असा भव्य उपक्रम राबविण्यात येत आहे‌. विद्यार्थ्यांसाठी विचारविश्व उलगडणारा प्रेरणादायी मंच राहणार आहे‌. 

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या TED (Technology, Entertainment, Design) या संकल्पनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाची यंदाची संकल्पना “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगातील शिक्षण – विचार व कौशल्यांची जडणघडण” अशी आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवविचार, सर्जनशीलता, तंत्रज्ञानाची जाण आणि भविष्याभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या TEDx Talk मध्ये प्रभावशाली वक्ते आणि तज्ज्ञ मान्यवर विविध विषयांवर आपले विचार मांडणार आहेत. यामध्ये कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. अर्शद सय्यद, इन्फ्लुएंसर मंदार पाडवळ, लेखक अतुल कहाते,  उद्योजिका ऐश्वर्या यादव आणि उद्योजक मुदस्सर अली रंगरेज यांचा समावेश आहे. शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर प्रेरणादायी संवाद होणार आहे.

दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध सत्रे, सांस्कृतिक सादरीकरणे, ओपन पॅनल डिस्कशन तसेच विद्यार्थ्यांशी थेट संवाद यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सर्जनशील विचारसरणी आणि जागतिक व्यासपीठाशी जोडण्याची संधी मिळणार असल्याने हा उपक्रम संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

हा कार्यक्रम विद्यार्थी, कर्मचारी, व्यावसायिक व सर्वांसाठी सशुल्क खुला असणार आहे. यामध्ये पास, प्रमाणपत्र, ओळखपत्र व जेवणाची सोय करण्यात आली आहे. इच्छुकांनी सहभागासाठी अधिक माहितीसाठी डॉ .प्रदीप तपकिरे‌ (मो. 9767890517), अर्शद सय्यद व जीवनकुमार तोळणुरे (मो. 9822342644) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post Views: 29
Previous Post

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान अंतर्गत १ कोटी निधी मंजूर

Next Post

मासिक पाळी नैसर्गिक ; बालविवाह अमानवी कृत्य

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मासिक पाळी नैसर्गिक ; बालविवाह अमानवी कृत्य

ताज्या बातम्या

मंठा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा सापळा; पोलीस अमलदारासह निरीक्षक ताब्यात

March 14, 2026

पिलीव येथील उप कृषी अधिकारी कोळेकर एस.एच यांची मंडल कृषी अधिकारीपदी पदोन्नती

March 14, 2026

कु.क्रांती निलेश गावडे जिल्हास्तरीय इस्रो सहल निवड परीक्षेत तालुक्यातून प्रथम

March 14, 2026

आनंद साधना प्रकल्प उद्योग केंद्रात बौद्धिक अक्षम दिव्यांगांच्या पालकांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

March 14, 2026
कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

March 14, 2026
शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

March 14, 2026
जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

March 14, 2026
मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

March 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0732552

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697