बार्शी – बार्शी-सोलापूर रस्त्यावर पानगावजवळ कारने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी दाखल न करता तसेच पोलिसांना माहिती न देता कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भास्कर बब्रुवान जाधव (वय ५३, रा. कळंबवाडी (पा.), ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात त्यांचा मुलगा अक्षय भास्कर जाधव आणि पत्नी नीता भास्कर जाधव हे दोघे जखमी झाले आहेत.