Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
January 28, 2026
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त श्री  बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे अध्यक्ष श्री चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.


बुधवार २८ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी शिक्षण संकुल  येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . शुक्रवार ३० जानेवारी रोजी अक्कलकोट रोड येथील एस. व्ही. सी. एस. डी. एड. कॉलेज  येथे वक्तृत्व स्पर्धा, श्लोक पाठांतर स्पर्धा,  शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व शनिवार ३१ जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा व १ फेब्रुवारी रोजी श्री भगवती गौरीमाता प्रशाला धोत्री येथे चतुर्थी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने सकाळी ९.०० वा. सर्व रोग निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटे२.१० वा. उत्तर कसव्यातील होटगी मठात व मौजे होटगी  ता.द.येथील मठात  शिवाचार्यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रद्धांजली समर्पण सभा होणार आहे. पहाटे ५.०० वा. काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात श्री चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे आत्मज्योत शिरावर घेऊन हजारो भक्तगणांच्या समवेत भक्तीमय वातावरणात उत्तर कसव्यातील होटगी मठातून मौजे होटगी ता.द.सोलापूर कडे सवाद्य मिरवणुकीने मार्गस्थ होणार आहेत.


श्री वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त  बाळीवेस येथील मठात गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० वा. श्री गुरु गादीस संगीत महारुद्र पूजा,  सहस्त्रबिलवारचन, सायंकाळी ६.०० काशी जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात व शिवाचार्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास आरोग्य दूत तथा वैद्यकीय सहायता कक्ष चे प्रमुख मंगेशजी चिवटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रात्री ८.०० वा.गीतसंध्या व १०.०० वा. भजन व किर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. सोमवार  २६ जानेवारी ते गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी पर्यंत बाळीवेस व मौजे होटगी ता.द. सोलापूर येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री सिद्धांत शिखामणी पारायण, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बाळीवेस मठात भजन, भारुड व किर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील बृहन्मठात बुधवार ४ फेब्रुवारी रोजी प्राईम केअर हॉस्पिटल व रेणुकाचार्य क्लिनिक यांच्या सौजन्याने डॉ आप्पासाहेब उमदी यांच्या दवाखान्यात आरोग्य तपासणी शिबिर होणार असून प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर राहुल कारीमुंगी यांची  उपस्थिती असणार आहे. त्याच दिवशी होटगी भक्तगणांच्या वतीने सकाळी ९.००वा. रक्तदान शिबिर व सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी ते गुरुवार ५ फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी ७.०० वा. पडदहळी( कर्नाटक) येथील प्रसिद्ध प्रवचनकार महालिंगया शास्त्री- हिरेमठ यांचे प्रवचन  आयोजित केलेला आहे.

शुक्रवार ६ फेब्रुवारी सकाळी ११.०० वा. आत्मज्योतीचे होटगी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दु. ४.०० वा. नंदीध्वज व पालखी उत्सव, सायं. ७.०० वा. पाळणा, रात्री ८.००वा.शोभेचे दारूकाम  होणार आहे. संस्थेने आयोजित केलेल्या या सर्व कार्यक्रमात भक्तगणानी तन, मन,धनाने सहभागी व्हावे असे आवाहन श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.


चौकट- वीरतपस्वी व्याख्यानमाला व आनंदमेळाचे आयोजन –  बुधवार दि ४ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा.
 श्री चक्रवर्ती सुलेबली यांचे ‘स्वामी विवेकानंद एक विचार प्रवाह’ या विषयावर व्याख्यान होणार  असून शनिवार ३१ जानेवारी   ते  सोमवार २ फेब्रुवारी असे ३ दिवस सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० पर्यंत अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणात विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम,  ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत भव्य आनंदमेळाचे आयोजन करण्यात आलेले असून या आनंदमेळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Post Views: 43
Previous Post

युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचा देशव्यापी संप

Next Post

मंत्री गिरीष महाजन यांच्या विरोधात आक्रोश; पोस्टरला जोडे मारत भीमसैनिकांनी जाळले पोस्टर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मंत्री गिरीष महाजन यांच्या विरोधात आक्रोश; पोस्टरला जोडे मारत भीमसैनिकांनी जाळले पोस्टर

ताज्या बातम्या

रस्ता खोदल्याने पाण्याचे डबके वालसावंगी पारस सिमेंट रस्त्याचे काम महिन्यापासून बंद

April 30, 2026

सिंहगडच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

April 30, 2026

सोलापुरात आयपीएल फॅन पार्क ; क्रिकेटप्रेमींसाठी स्टेडियमसारखा थरार

April 30, 2026

सोलापूरचा समृद्धी तर शेवतेचा आदर्श संघ जिल्हा चॅम्पियन

April 30, 2026

महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

April 30, 2026

सोयगाव मध्ये अवैध लाकूड वाहतूक करणारी ट्रक जप्त

April 30, 2026

तत्कालीन जिल्हाक्रीडा अधिकारी नितीन तारळकर निलंबित

April 30, 2026

बाहुबली मंदिरात पूज्य वीरसागर मुनिश्रींचे ,ससंघ उत्साहात स्वागत

April 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0838551

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697