सांगोला – आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था, सांगोला यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांगोला नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंद माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, गटनेते प्रशांत धनवजीर तसेच विरोधी पक्षनेते इंजि.रमेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी हे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका सर्व आजी माजी सैनिकांच्या घरोघरी पोहोचवून हे कार्य मोठ्या निष्ठेने आणि जबाबदारपणे पार पाडतात.
याबद्दल त्यांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला. यावेळी आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















