पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील किराणा मालाचे दुकानदार प्रशांत गांधी यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे 28 जानेवारी रोजी राञी दहाच्या सुमारास शटर उचकटून त्यातील सुमारे 12000 हजार रुपये किमतीचा बदाम, जमीनी कंपनीचे खाद्य तेलाचे दहा डबे किंमत 15000 ,दहा डझन कोलगेट किंमत 8000 ,संतुर साबणा चार बाॅक्स, 3000 रुपये, चांदीचा करंड 7500 रुपये, 90 ग्रॅम वजनाचे चांदीचे तिन चमचे 4500, 10500 रुपये किमतीच्या तिन डिसेस, 7500 रुपये किमतीचे तिन ग्लास असे एकुण 68000 रुपये किमतीचा माल चोरीस गेला आहे .
याची माहीती प्रशांत गांधी यांनी पिलीव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी झगडे यांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला व अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्रशांत गांधी यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून सीसीटीव्ही कॅमेर्याची केबल कट करुन दुकानात प्रवेश करीत दुकानातील किराणा माल व कपाटातील चांदीची भांडी असे एकुण 68000 हजार रुपयांची चोरी केली म्हणून अज्ञात व्यक्तीविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गु.र.नं 28/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या घटनेनंतर माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच याठिकाणी सोलापूर येथील श्वान पथकाने येऊन याठिकाणी पाहणी केली.प्रशांत गांधी यांच्या ह्याच दुकानात या अगोदरही दोन _ तिन वेळा चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता .
या चोरीच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी झगडे हे करीत आहेत.
पिलीव येथील महालक्ष्मी देवीची याञा येत्या एक फ्रेब्रुवारी पासुन सुरू होत आहे .त्या अगोदर सदरची चोरी झाल्यामुळे पिलीव परीसरात भिती निर्माण झाली आहे. फोटो _ पिलीव येथील प्रशांत गांधी यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी

























