सांगोला – राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायधीश एम.एस.शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सचिव पी.पी.पेठकर यांचे सहकार्याने सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ सेवा संघ, सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने कै.सरदार शामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्यू.कॉलेज, अकोला-वासूद (ता.सांगोला) येथे महिला सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता या विषयावर कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सांगोला विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड.एस.बी.दिवसे, महिला प्रतिनीधी ॲड. एस.व्ही.बोत्रे, ॲड.एच.डी.मेनकुदळे-घोंगडे, ॲड.एन.एम.जवंजाळ, विद्यालयाचे पर्यवेक्षक व्यवहारे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे प्रतिमा पुजनाने करणेत आली. शिबीरात बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर ॲड. एच.डी.मेनकुदळे-घोंगडे यांनी सुकन्या समृध्दी योजना या विषयावर सांगोला पोस्ट ऑफीस मधील डी.एम.इंगळे यांनी तरच मुलींना सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता या विषयावर ऋतुजा नानासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.जी.एम.खटाकळे यांनी केले. आभार शिक्षक डी.टी.घोरपडे मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगोला न्यायालयाचे सहा.अधिक्षक ए.एस. बमनळ्ळी, डी.डी.मायभाटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपीक डी.एम.डोईफोडे, पी.एल.व्ही पी.एच.पवार व विद्यालयाचे पर्यवेक्षक व्यवहारे तसेच सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.
सांगोला सह.दिवाणी न्यायाधीश ए.ए.पाटील यांनी मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचे नमूद करत मुलगी शिकली, प्रगती झाली याचे महत्व त्यांनी आपले अध्यक्षीय भाषणातून सर्वांना समजावून सांगितले. तसेच मुली व महिला सक्षमीकरणाकरीता बनविणेत आलेले अनेक कायदे, अनेक शासकीय योजना व त्यांची उपयोगीता ही उदाहरणासह सर्वांना अतिशय प्रभावीपणे कळवून दिल्या.
























