आव्हाना – भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत सदस्य साहेबराव सपकाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच राम दुधे, उपसरपंच सुनील पाटील सरोदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या सामाजिक विचारांवर प्रकाश टाकत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी समाजाला दिला असल्याचे मत व्यक्त केले. समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित ग्रामस्थांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात जयंतीनिमित्त प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
























