सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालय येथे संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस सहायक आयुक्त मनीषा मगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार व राष्ट्रीय चर्मकार महासंघ , प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष राम कबाडे, शहर अध्यक्ष परशुराम मागृखाने, मध्यवर्ती जयंती अध्यक्ष चंद्रकांत मागृखाने , प्रदीप लांबतुरे, भीमराव वाघमारे, अविनाश चाबुकस्वार ,सिद्धू तिमीगार अशोक खडके आदी मनपाचे सेवक उपस्थित होते.



























