बार्शी – गणित मंडळाच्यावतीने सुलाखे हायस्कूल बार्शीचे मुख्याध्यापक श्री. स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करुन भावी आयुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रताप दराडे यांनी हिरोळीकर सरांनी मुख्याध्यापक कालावधीत शाळेच्या प्रगतीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. अबूबकर इनामदारांनी सरांसोबतच्या प्रशिक्षणामधील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
हिरोळीकरिंचा सरांनी आपल्या मनोगतात सर्व गणित मंडळ सदस्यांचे आभार मानले व भविष्यात सहकार्याचे आश्वासन दिले.
या वेळी तालुका अध्यक्ष शंकर आगलावे, उपाध्यक्ष संदेश घाडगे, अमोल माढेकर, संतोष साळुंके, सूर्यकांत चोरमुले, सुधीर काकडे, जैनुद्दीन शेख, राजकुमार कुलकर्णी उपस्थित होते.


























