Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत नामदेव स्मारकासाठी ९० कोटी मंजूरअ‍ॅड.महेश ढवळे; दहा एकर जागेत लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार

तरुण भारतbyतरुण भारत
February 2, 2026
in marathwada
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक, श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पंढरी नगरीत भव्य असे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. महेश ढवळे यांनी दिली.

संत नामदेव महाराज स्मारक कामाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि.३०) नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर बोलताना अ‍ॅड. ढवळे यांनी माहिती दिली.

संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी चंद्रभागा नदीच्या पलीकडे भक्तीसागर येथे रेल्वे विभागाची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून याठिकाणी दहा एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत सोलापूर, पुणे व मुंबई येथे मंत्री, अधिकार्यांसमवेत अनेक बैठका पार पडल्या. याबाबत अनेक समस्या निर्माण होत होत्या. अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषद व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.

पंढरी नगरीत जुलै महिन्यात झालेल्या श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीत येणार्या अडचणी दूर करून लवकरच स्मारकाचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.३०) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.

पुढे बोलताना अ‍ॅड. महेश ढवळे म्हणाले, सुमारे १० एकर जागेमध्ये संत नामदेव महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे समारक उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार आहे. या कामासाठी राज्याचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. 

स्मारक उभारणीसंदर्भात अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषद, श्री केशवराज संस्था पंढरपूरचे अध्यक्ष रुपेश खांडके, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर व सोलापूरच्या पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर स्मारकाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून लवकरच हे काम सुरु होणार असल्याचे अ‍ॅड. महेश ढवळे यांनी सांगितले. 

यावेळी एकसंघाचे उपाध्यक्ष नंदकुमार कोसमतवार, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव अजय फुटाणे यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
——————————-

भागवत धर्माची पताकाही उभारा

संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकावून भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला. या पार्श्वभूमीवर पंढरीत चंद्रभागेच्या तिरी उभारण्यात येणार्या संत नामदेव महाराजांच्या स्मारकाजवळ भागवत धर्माची उंच पताका उभारण्यात यावी अशी मागणी पंढरपुरातील सर्व महाराज मंडळी, वारकरी, फडकरी मंडळी व समस्त नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आली असून ती मान्य करण्यात आली असल्याची माहिती अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली.

Post Views: 41
Previous Post

बारामती येथे सायकलवरती जाऊन स्व अजित दादांना मंगळवेढेकरांच्या वतीने वाहिली आदरांजली

Next Post

माघ वारीत सिंहगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘पोलिस मित्र’ म्हणून उल्लेखनीय सहभाग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माघ वारीत सिंहगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘पोलिस मित्र’ म्हणून उल्लेखनीय सहभाग

ताज्या बातम्या

सोलापूरच्या महापौरपदी विनायक कोंड्याल यांची तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड #news #viral

February 2, 2026

सोलापूर–हिंगोली रात्री ९ वाजताची एसटी बस तीन दिवसांपासून रद्द

February 2, 2026

श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

February 2, 2026

बडोदा फुल मॅरेथॉनमध्ये सोलापूरचे अतिश शहा तृतीय

February 2, 2026

माघ वारीत सिंहगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘पोलिस मित्र’ म्हणून उल्लेखनीय सहभाग

February 2, 2026

संत नामदेव स्मारकासाठी ९० कोटी मंजूरअ‍ॅड.महेश ढवळे; दहा एकर जागेत लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार

February 2, 2026

बारामती येथे सायकलवरती जाऊन स्व अजित दादांना मंगळवेढेकरांच्या वतीने वाहिली आदरांजली

February 2, 2026

गणित मंडळाच्यावतीने स्वामीराव हिरोळीकरिंचा सन्मान 

February 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0653197

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697