सोलापूर – गुजरात येथे रविवारी झालेल्या बडोदा फुल मॅरेथॉनमध्ये अतिश शहा यांनी तृतीय स्थान संपादले.
त्यांनी 42.195 किमी अंतर 3 तास 38 मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करून 40 ते 50 वयोगटात ही कामगिरी केली. याआधी त्यांनी 21 आणि 10 किमी स्पर्धांमध्येही कामगिरी केली असून आता पूर्ण मॅरेथॉनमध्येही त्यांनी यशस्वी कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे.
‘चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन’च्या माध्यमातून ते दरवर्षी सोलापूर येथे ‘आझादी अल्ट्रा मॅरेथॉन’चे आयोजन करतात. तसेच गरजू धावपटूंना कोचिंग देऊन प्रोत्साहनही देतात.
—–
अनुभव व योग्य प्रशिक्षणामुळे ही कामगिरी शक्य
त्यांच्या या यशाबद्दल सर्व क्रीडा व रनिंग प्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अनुभव, योग्य प्रशिक्षण आणि रेसदरम्यानचे प्रभावी हायड्रेशन यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे अतिश शहा यानी सांगितले.


























