सोलापूर : येथील विद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा (निरोप) समारंभ अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव मा. हाजी बंदेनवाज शेख सर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य इस्माईल शेख सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिस्त, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर जीवनात यश मिळवता येते. शिक्षण हीच खरी संपत्ती असून समाजासाठी उपयोगी ठरणारे नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य इस्माईल शेख सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
तसेच सर्व प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आदर्श विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये
धनके ओंकार व वैष्णवी बिराजदार
यांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले व प्रेरणादायी थाप देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शितल राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.महेंद्र ढवाण यांनी केले, व कार्यक्रमाची सांगता झाली. सदिच्छा समारंभ विद्यार्थ्यांच्या आठवणीत कायम राहील, असा हा कार्यक्रम ठरला.
फोटो : *इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसमवेत संस्थापक सचिव हाजी बंदेनवास शेख,प्राचार्य इस्माईल शेख, प्रा.अनंत सुरते, प्रा. धनाजी धेंडे, प्रा.शितल राठोड,प्रा.महेंद्र ढवाण, प्रा, ताजुद्दीन शेख , प्रा.अर्चना दीक्षित इ.*


















