अक्कलकोट – भारताला विश्व गुरु बनविण्यासाठी जातीपातीत भेदाभेद न मानता विश्व हिंदू परिषदेच्या सामाजिक समरसता अभियान यात्रेत समस्त हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र (महाराष्ट्र/गोवा) संघटनमंत्री अनिरुद्ध तथा अण्णा पंडित यांनी केले.
आगामी काळात भारताला विश्व गुरु बनविण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी हिंदू धर्मातील जाती पाती मध्ये भेदाभेद न मानता विश्व हिंदू परिषदेच्या सामाजिक समरसता अभियानाच्या कार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्राचे संघटनमंत्री अनिरुद्ध पंडित यांनी केले आहे. विहिंप प.महाराष्ट्र प्रांत सामाजिक समरसता अभियान यात्रेचा शुभारंभ अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जवळील किणी मोड लमाणतांडा येथून झाला. प्रारंभी संत सेवालाल महाराज व जगदंबा मातेच्या मूर्तीचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे विहिंप प. महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रा.गजानन धरणे, सामाजिक समरसता प्रमुख निखिल कुलकर्णी, विभाग सहमंत्री तथा यात्रा प्रमुख विजयकुमार पिसे, जिल्हाध्यक्ष अभिमन्यू डोंगरे महाराज, अॅड. संकेत राव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत कुलकर्णी, संजयकुमार जमादार, जिल्हा सहमंत्री विष्णू जगताप,सहप्रमुख विकास कुलकर्णी, बजरंग दल सहसंयोजक अभय कुलथे,सह संयोजक अनिल कोळी,अक्कलकोट प्रखंड मंत्री मेजर बालाजी राजपूत आणि बजरंग दल संयोजक मदन राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लमाण समाजाच्या पारंपारिक रुढी नुसार सेवालाल महाराज व आई जगदंबेच्या मंदिरासमोर होमहवन प्रसादाची आहुती दिली. तसेच सामाजिक समरसता अभियाना निमित्त सजावट केलेल्या चित्ररथाची विधीवत पूजा झाली. जातीपातीत अस्पृश्यता न मानता सर्वांना हिंदुत्वाच्या आधारावर,एकत्रित येवून विखुरलेल्या समाजाला एकसंध करण्याचे काम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गत 61 वर्षापासून सुरू असल्याचे मुंबई क्षेत्र संघटनमंत्री अनिरुद्ध पंडित यांनी सांगितले.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी,खर्या अर्थाने आपल्या क्रांतिकारक योध्द्यासोबत आपल्या जीवाची पर्वा न करता भटक्या जाती जमाती मधील ही क्रांतीकारांनी हिरारीने भाग घेवून परकीय आक्रमणे रोखण्यासाठी युद्ध भूमीवर लढाया केल्या. समाज एकसंध करण्याकरिता विहिंप सामाजिक समरसता अभियानाच्या कार्यात सर्व हिंदूंनी संघटित व्हावे, असे प्रतिपादन प्रांताध्यक्ष प्रा.गजानन धरणे यांनी केले.
आम्ही सर्व हिंदू एक आहोत हा संदेश हिंदूंच्या वंचित घटकांपर्यंत पोहचण्यासाठीच असे अभियान सुरू केले असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सामाजिक समरसता अभियानाचे प्रांत प्रमुख निखिल कुलकर्णी यांनी याप्रसंगी बोलताना दिली. सामाजिक समरसता अभियानाच्या चित्ररथाचे उद्घाटन प्रा.गजानन धरणे, मुंबई क्षेत्राचे संघटनमंत्री अनिरुद्ध पंडित यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कार्यक्रमास रामचंद्र राठोड पुजारी, राजु चव्हाण,मेघराज राठोड,चंदु बंदिछोडे,रवि राठोड,रमेश जाधव,बिराप्पा बंदिछोडे, देवेंद्र बंदिछोडे,हरीदास राठोड,सुरेश बंदिछोडे,जालींदर कदम,रविंद्र राठोड,देविदास राठोड,गोपीनाथ चव्हाण कारभारी,बाबु राठोड,निलु राठोड,पिंटू चव्हाण कारभारी,मदनकुमार राठोड,ज्ञानेश्वर पाटील व किणीमोड लमाण तांड्या वरील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर चित्ररथाचे अक्कलकोट शहरातील बेडर समाजाच्या वतीने श्री मरीआई मंदिरात धर्मराज गुंजले,शिवराज मलवे,सचिन कुर्ले,नागेश मिलगले,सुरज कुर्ले,सुनिता मिलायली,सुगलाबाई मिनगले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या शुभहस्ते बेडर समाजाचे आराध्यदैवत श्री मरीआई व बेडर कन्नय्या ची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली.त्यावेळी या यात्रेसंदर्भात मार्गदर्शन प्रा.गजानन धरणे व निखिल कुलकर्णी यांनी केले.
























