अकलूज – टिशू कल्चर चा वापर करून केळी, ऊस, खजूर, बांबू, जरेबेरा या पिकांची उत्पादने घेऊन भरपूर नफा कमवता येतो असे विचार येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये आयोजित वनस्पतीशास्त्र विभाग व ऍग्रो केमिकल व पेस्ट मॅनेजमेंट विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘ वनस्पती उती संवर्धनातील प्रगती आणि संधी ‘, या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून फिरोज चिकाळे यांनी व्यक्त केल. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवप्रसाद टिळेकर हे होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त कौशल्य विकसित करावीत व स्वतःचा उद्योग निर्माण करणेही आवश्यक आहे. असे विचार व्यक्त केले.
पुढे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी फिरोज चीकाळे यांनी वनस्पती उती संवर्धनातील मूलभूत संकल्पना , उती संवर्धनाचे टप्पे, त्याची प्रक्रिया आणि प्रकार यावर व्याख्यान दिले. तसेच त्यांनी प्रत्यक्ष कार्य कौशल्य प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला दिले. यामध्ये त्यांनी त्यांच्या मॉन्टी प्लांट इंडिया या उद्योगाची ही माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग करावा यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनस्पती शास्त्र प्रमुख डॉ. सविता सातपुते मॅडम यांनी केले.उपस्थित सर्वांचे आभार डॉ. दमयंती कांबळे मॅडम यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मधुलिका नवघरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. विक्रम कुंभार, डॉ. सुजित वाघ, प्रा. अनंत साठे, प्रा. दीपराज माने देशमुख आणि ऍग्रो केमिकल्स आणि पेस्ट मॅनेजमेंट विभागातील प्रा रोहित कुंभार, प्रा प्रमोद घोगरे, प्रा नंदकुमार गायकवाड प्रा स्नेहल पांढरे मॅडम प्रा माने मॅडम प्रा सूर्या यादव यांनी परिश्रम घेतले.

























