हदगाव – नगरपरिषद येथे काही दिवसापूर्वी आयएएस दर्जाचे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून दोनूरु अनन्या रेड्डी ह्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले असून त्यांनी नगरपालिकेच्या कर रुपी जमा होणाऱ्या रक्कमेत वाढ व्हावी या उद्देशाने नगरपालिका च्या मालकीचे असलेले गाळेधारकांना गाळेभाडे थकीत रक्कम वसूल करण्यासाठी नोटीस देऊन सुद्धा रक्कम भरले नाहीत असे गाळेधारकांना आज ताळेबंद ची कारवाई करण्यात आली.
यावेळेस स्थापत्य अभियंता सचिन वाघमारे,रचना सहाय्यक धीरज झुडपे, कर निर्धारण अधिकारी प्रवीण मंगनाळे, गोविंद नागरगोजे यांच्यासह पालिकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रभारी मुख्याधिकारी रेड्डी यांनी शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या भाजीपाला दुकानांमुळे वाहनधारकांना होत असलेल्या त्रासाबद्दल व वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता याची दखल घेत त्यांना हक्काचे असलेले भाजी मार्केटमध्ये क्रमवारी पद्धतीने दुकाने देऊन त्यांचे स्थलांतर करण्यात आले. कर म्हणून जमा होणाऱ्या रक्कम व पालिका प्रशासनाचे असलेले गाळेधारकांनी भाडेरूपी थांबविली रक्कम तात्काळ भरण्यासंदर्भात नोटीस देऊन सुद्धा गाळे भाडे भरले नाहीत अशा राजीव गांधी मार्केट मधले दुकानांना ताळेबंदीची कारवाई आज रोजी करण्यात आली असून यामुळे गाळे भाडे थांबवलेल्या दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.

















