Monday, February 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“सिनियर ॲडव्होकेट” या सन्मानाणे गौरविल्याबद्दल सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने गौरव

तरुण भारतbyतरुण भारत
February 6, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, विधीक्षेत्रातील एक प्रख्यात व्यक्तिमत्त्व, सर्वांचे गुरुवर्य व मार्गदर्शक ॲड. व्ही. एस. आळंगे यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा तर्फे दिला जाणारा अत्युच्च, मानाचा व प्रतिष्ठेचा “सिनियर ॲडव्होकेट” हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा मानाचा पुरस्कार भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते प्रदान होऊन ॲड. आळंगे सरांचा गौरव करण्यात आला. या ऐतिहासिक, अभिमानास्पद व गौरवपूर्ण प्रसंगाचे औचित्य साधून सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोलापूर बार असोसिएशन हॉल, सोलापूर येथे भव्य अभिनंदन व गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्ह्याचे सरकारी वकील डॉ. ॲड. प्रदीपसिंग रजपूत हे उपस्थित होते. तसेच सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख, सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे, सहसचिवा ॲड. मीरा प्रसाद, खजिनदार ॲड. अरविंद देडे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव तसेच प्रमुख पाहुणे डॉ. ॲड. प्रदीपसिंग रजपूत यांच्या हस्ते ॲड. व्ही. एस. आळंगे सरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन औपचारिक सत्कार करण्यात आला. यानंतर ॲड. आळंगे सरांच्या सर्व जूनियर वकिलांनीही सामूहिकरीत्या आपल्या गुरुवर्यांचा विशेष सत्कार करून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

 आपल्या कारकिर्दीत आळंगे सरांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच न्यायालयीन क्षेत्रात स्वतःला घडवता आले, असे भावनिक मनोगत अनेक जूनियर वकिलांनी व्यक्त केले.
या गौरव समारंभात ॲड. सरोजिनी तमशेट्टी मॅडम, ॲड. शिवानंद गंजी, ॲड. मैत्रेयी सोलनकर, ॲड. राजेंद्र फताटे, ॲड. हिराचंद अंकलगी, ॲड. विक्रमसिंग काटुळे, ॲड. महादेव जवळगी, ॲड. अशोक जालादी, ॲड. लक्ष्मण मारडकर, उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख, डॉ. ॲड. प्रदीपसिंग रजपूत तसेच अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी आपापल्या मनोगतातून ॲड. आळंगे सरांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत व आदर्श कायदेविषयक कारकिर्दीचा गौरव केला. त्यांनी न्यायालयीन शिस्त, प्रामाणिकपणा, घटनात्मक मूल्यांप्रती असलेली निष्ठा व सामाजिक भान या गुणांचा विशेष उल्लेख केला.

कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. व्ही. एस. आळंगे सरांनी स्वतः उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी विधी व्यवसाय हा केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. तरुण वकिलांनी सातत्यपूर्ण अभ्यास, संयम, नैतिकता व न्यायालयाविषयी आदर ठेवावा, तसेच ज्येष्ठांकडून शिकण्याची वृत्ती कायम ठेवावी, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. त्यांचे मनोगत उपस्थित वकिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर बार असोसिएशनचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले. या गौरव समारंभास सोलापूर बार असोसिएशनचे असंख्य ज्येष्ठ व कनिष्ठ वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ॲड. व्ही. पी. शिंदे, ॲड. रविंद्र पाटील, ॲड. मनोज पामुल, ॲड. विद्यवंत पांढरे, ॲड. अभय बिराजदार, ॲड. मल्लीनाथ पाटील, ॲड. शुभम माने, ॲड. सागर स्वामी, ॲड. भारत उजळंबे, ॲड. शर्मिला देशमुख, ॲड. नंदिनी किणीकर, ॲड. गणेश माशाळे, ॲड. संतोष म्हमाणे, ॲड. संजय पवार, ॲड. विनयकुमार कटारे, ॲड. निदा सैफन, ॲड. अंजली बाबरे, ॲड. चंद्रसेन गायकवाड आदींचा समावेश होता.


सोलापूर बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेला हा गौरव समारंभ विधीक्षेत्रातील आदर्श परंपरेचे दर्शन घडवणारा, प्रेरणादायी व ऐतिहासिक ठरला.

Post Views: 83
Previous Post

२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकनाथ यशवंत

Next Post

१७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या.#breakingnews #solapur #news #viral #public #popular #trand

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या.#breakingnews #solapur #news #viral #public #popular #trand

ताज्या बातम्या

जि.प.कन्या शाळेमध्ये वार्षिक संमेलन संपन्न; बाल धमाल कार्यक्रमात विद्यार्थांनी जिंकली मने

February 9, 2026

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण

February 8, 2026

अशोकराव चव्हाण यांनी घेतला जगद्गुरु श्री भीमाशंकर शिवाचार्य यांचा आशीर्वाद

February 8, 2026

सिडकोत साई सर्जिकल अँड नर्सिंगहोम चा शुभारंभ

February 8, 2026

पोलिसांची धडक कारवाई : ४० लाखांच्या मुद्देमालासह हायवा जप्त

February 8, 2026

सत्यजित बिरादार यांची युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी नियुक्ती

February 8, 2026

त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२८ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी

February 8, 2026

श्री रामलिंग देवस्थान येथे भव्य अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0667202

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697