अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील दिशा विहार मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या श्री दक्षिणमुखी हनुमान मूर्तीची वेदमूर्ती गुड्डय्या स्वामी यांच्या विविध मंत्रोच्चारात हुबळी मठाचे मठाधिपती श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शहरासह लोकमंगल विहार परिसरातील हजारो भाविक यावेळी उपस्थित होते.
लोकमंगल विहार परिसरात श्री स्वामी समर्थ महाराज व श्री मंगलदास आश्रम असून, येथे नियमितपणे विविध धार्मिक उपक्रम होतात. वेदमूर्ती श्री रुद्रय्या स्वामी महाराज यांच्या पुढाकाराने सदरची मंदिर लोकवर्गणीतून अवघ्या दहा महिन्यात उभारण्यात आले असून, येथे श्री हनुमान मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्त मागील आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम येथे उत्साहात झाले. या परिसरातून श्री हनुमान मूर्तीची व कळसारोहण शोभायात्राही काढण्यात आली होती. शोभायात्रेत पुरवंत यांचे खेळ सादर करण्यात आले होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व फुलांच्या वर्षावाने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. विविध भक्तीगीते सादर केली गेली. मिरवणुकीत सहभागी असलेले हनुमान मूर्ती व कळसारोहण यांना फुलांच्या माळा घालून भाविकांनी दर्शन घेतले. दोन तास निघालेल्या शोभायात्रेचे या परिसरात मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण होवून दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ समारोप झाला.
दुसऱ्या दिवशी मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण उत्सव विधिवत होमहवनाने झाला. त्यानंतर श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी महास्वामीजी यांची धर्मसभा संपन्न झाली.
शेवटी उपस्थित हजारो भाविकांना उद्योगपती सिध्दाराम टाके यांच्या लोकमान्य सुपर बझार तर्फे खिरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड,
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, सचिव श्याम मोरे, श्री स्वयंभू गणेश मंदिराचे ओंकार ग्रामोपाध्ये, उद्योगपती विलास कोरे, एजाज मुत्तवली, भिमाशंकर कुंभार, प्रथमेश इंगळे,
सुनील गोरे, उरुजपाशा पिरजादे, शिवाजी लोखंडे, विक्रम हर्डीकर, सचिन स्वामी, इंजिनियर महेश शेडम व गुरु पोतदार, उषा हंचाटे, नगरसेविका भागुबाई कुंभार, अमृता शिंदे, नगरसेवक अविनाश मडिखांबे, नन्नु कोरबू, लक्ष्मीकांत धनशेट्टी, आनंद चौगुले, अशोक जाधव, रुद्रय्या स्वामी, निनाद डांगे
आदींसह परिसरातील शेकडो भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन विरुपाक्ष कुंभार यांनी केले.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करेप्पा रोवली, रमेश शिंदे, गुरुशांत कुंभार,नागराज व बसवराज कुंभार, शांतविरप्पा दसले, दिगंबर साळुंखे , अविनाश कोरे, वेदेश गुरव, गुरु कुंभार , सुनिल आळंद, मल्लिकार्जुन पाटील, सचिन डिग्गे , सचिन जरीपटके, सुनिल जमादार, बसवराज अगरखेड ,अनिल शिंदे , प्रणव शेटे, शंकर माळी, विरेश कुंभार व मंदिर पंच कमिटीने परिश्रम घेतले.
श्री वटवृक्ष दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या उभारणीसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले महाराज यांनी लाखो रुपयांची श्री हनुमान मूर्ती भेट दिली आहे. तर कळस सेवा माजी सैनिक अनिल हत्ते यांनी केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांतून कौतुक व्यक्त होत आहे .

























