सोलापूर – अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी बार्शी येथील सराईत गुन्हेगार टोळीस ०१ वर्षाकरीता हददपार केले आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये “मोहसिन साबीर तांबोळी” व त्याच्या टोळीतील सदस्या विरुध्द पोलीस निरीक्षक, बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता.
या टोळीमध्ये टोळी प्रमुख “मोहसिन साबीर तांबोळी, टोळी सदस्य शहाबाज जहाँगीर शेख, इब्राहिम राजअहमद शेख, अखिल इब्राहिम सय्यद,” सर्व राहणार बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर असे सदस्य आहेत. टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी सोलापूर जिल्हयात तसेच बार्शी तालुक्यात दहशत माजवुन खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून जबर इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, महिलेची छेडछाड करणे, जातीवाचक शिवीगाळी करणे, शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे टोळीसह तर कधी टोळीचा सदस्य म्हणुन केले होते.
टोळीने संघटीतरित्या एकत्र येवून तर कधी टोळीचा सदस्य म्हणुन स्वतंत्ररित्या गुन्हे करून सामाजीक स्वास्थ बिघवडत होते व टोळीची दहशत निर्माण करत होते. टोळीतील सदस्य इब्राहिम जहाँगीर शेख यास यापुर्वी हददपार करण्यात आले होते, तसेच इतराविरूध्द प्रतिबंध कारवाई करून देखील त्यांच्यात सुधारणा होत नव्हती. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यास आळा घालण्यासाठी प्रकरणाची सुनावणी अतुल कुलकर्णी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे समक्ष होवून टोळीस सोलापूर जिल्हयातुन एक वर्ष करीता हद्दपार करण्यात आले आहे.
सदरची कारवाई अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, यांनी केले असुन प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, अशोक सायकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी विभाग, यांच्या मार्गदर्शना खाली व. पोलीस निरीक्षक, संजय जगताप, ने. स्थानिक गुन्हे शाखा, पो. नि. बालाजी कुकडे, ने. बार्शी शहर पोलीसठाणे तसेच इतर अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कामकाज यांनी कामकान केला आहे.






















