Friday, June 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान

तरुण भारतbyतरुण भारत
February 9, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी, दि. ७ फेब्रुवारी रोजी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ६ जागा व पंचायत समितीच्या १२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायंकाळी उशिरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. सरासरी 67.79 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिलेली असून, अंतिम आकडेवारीत मतदानाची टक्केवारी सुमारे 68 टक्क्यांपर्यंत पोहोण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची वर्दळ दिसून आली. दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांनी लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. अपंग व वयोवृद्ध मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यामुळे अशा मतदारांनीही मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावला.

तहसील कार्यालयामार्फत दर दोन तासांनी मतदानाची अधिकृतपणे आकडेवारी जाहीर करण्यात येत होती. सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासांत सरासरी ९ टक्के मतदान झाले. त्यानंतर साडेनऊ ते साडेअकरा या कालावधीत मतदानाची टक्केवारी वाढून २२ टक्क्यांवर पोहोचली. साडेअकरा ते दीड या वेळेत ही टक्केवारी ३८ टक्क्यांपर्यंत गेली. दुपारच्या सत्रात दीड ते साडेतीन या वेळेत ५१.५७ टक्के मतदानाची नोंद झाली, तर मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडल्याने अंतिम टक्केवारी ६८ टक्क्यांपर्यंत वाढली.

 1) जिल्हा परिषदेच्या उपळाई (ठोंगे) गटात 71.78% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या उपळाई (ठोंगे) गणात 75.9 % व  आगळगांव गणात 67.57% मतदान झाले. 

2)  जिल्हा परिषदेच्या पांगरी गटात 67.19% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या पांगरी गणात 64.29%  व कारी गणात 70.12% मतदान झाले. 

 3) जिल्हा परिषदेच्या उपळे दुमाला गटात 67.52% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या उपळे दुमाला गणात 66.69% व गौडगाव गणात 68.25% मतदान झाले. 

 4) जिल्हा परिषदेच्या पानगांव गटात 68.24% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या बावी गणात 67.15% व पानगांव गणात 69.37% मतदान झाले. 

 5) जिल्हा परिषदेच्या मारवाडी गटात 66% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या मालवंडी गणात 69.06% व सासूरे गणात 63.02% मतदान झाले. 

 6) जिल्हा परिषदेच्या शेळगांव (आर) गटात 66.53% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या मानेगाव गणात 67.84 व शेळगांव (आर)पंचायत समिती गणात 65.37% मतदान झाले.

 ९५ वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क 

  ग्रामीण भागात महिला व पुरुषांनी रांगा लावत शिस्तबद्ध पद्धतीने मतदान केल्याचे चित्र दिसून आले. विशेष बाब म्हणजे बेलगाव येथील ९५ वर्षांच्या वयोवृद्ध आजी मिनाबाई मारुती शेळके यांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर आदर्श ठेवला.

 या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या अस्तित्वाचा प्रश्न केंद्रस्थानी राहिला.विस्तृतपणे बातमी बार्शी समाचार वर आहे. तसेच तालुक्यातील अनेक प्रमुख ग्रामीण नेते, पदाधिकारी व पुढाऱ्यांची आपापल्या गावांतील राजकीय पकड आणि प्रभाव या निवडणुकीच्या माध्यमातून कसोटीला लागलेला दिसून आला. यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले (ज्योतिबाची वाडी), माजी सभापती युवराज काटे (खामगाव), बाजार समितीचे सभापती विजय गरड (पांगरी), उपसभापती बाबासाहेब गायकवाड (शेळगांव आर), माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे (भालगांव) आदींचा समावेश आहे.

 वैराग भागाचे नेते संतोष निंबाळकर व वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांचा अनेक गावांवरील प्रभावही या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. मात्र, वैराग भागात शैक्षणिक संस्थांचे जाळे असलेल्या कै. बप्पासाहेब कोरके यांचे पुत्र डॉ. कपिल कोरके व यांचा गट या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैराग भागात निंबाळकर, भूमकर, डिसले व कोरके हे चार गट नेहमीच निर्णायक भूमिका बजावत असल्याचे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले.

 बोगस आधार कार्ड व बोगस मतदार 

 दरम्यान, पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील कारी गावातील मतदान केंद्रावर मयत मतदाराच्या नावाने बोगस आधार कार्ड तयार करून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस आमदार दिलीप सोपल गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 मात्र, किरकोळ घटना वगळता तालुक्यात कुठेही गंभीर अनुचित प्रकार घडला नसून संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली. निवडणूक निर्णय प्रशासन, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन, चोख बंदोबस्त व दक्षता घेतल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार शांततेत पार पडल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post Views: 87
Previous Post

विश्वविख्यात डॉ. एस राजशेखर यांनी स्वीकारले अक्कलकोटचे निमंत्रण 

Next Post

भागवत शिंदे भारत श्री मास्टर्स स्पर्धेत देशात पाचवे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भागवत शिंदे भारत श्री मास्टर्स स्पर्धेत देशात पाचवे

ताज्या बातम्या

सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ मंजूश्री कुलकर्णी यांचे निधन #solapurnews #marathinews

June 12, 2026

सोलापूरच्या एसटी स्टँडवर तामिळनाडूच्या प्रवाश्यासोबत घडले असे काही #viral #solapurnews #aajsolapur

June 12, 2026

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा अक्कलकोट पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा #solapurnews #viral

June 12, 2026

निलेश राणेनी त्या पोलीस अधिकाऱ्यांची…… #marathinews #maharashtranews #viral

June 12, 2026

अजित पवारांच्या या नेत्याने मन मोकळे केले…… #marathinews #maharashtranews

June 12, 2026

उजनीच्या पाण्याबाबत अधिकारी म्हणतात #marathinews #solapurnews

June 12, 2026
शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीसाठी  आझाद मैदान, मुंबई येथेआंदोलन ! !

शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीसाठी  आझाद मैदान, मुंबई येथेआंदोलन ! !

June 11, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या रमेश धोडमणीला राष्ट्रीय गतका स्पर्धेत कांस्य

सोलापूर विद्यापीठाच्या रमेश धोडमणीला राष्ट्रीय गतका स्पर्धेत कांस्य

June 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0905947

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697