सोलापूर – श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने आज सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष श्री शिद्रामप्पा बमणे यांच्या हस्ते सिद्धरामेश्वरांची प्रतिमा देऊन महापौरांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी देवस्थानचे इस्टेट सेक्रेटरी बाळासाहेब भोगडे, ऑफिस सेक्रेटरी नीलकंठप्पा कोनापुरे, अकाउंटंट सेक्रेटरी श्री विश्वनाथ लब्बा तसेच विश्वस्त प्रभुराज महेंद्रग्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना महापौर विनायक कोंड्याल यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थानाशी संबंधित सर्व प्रलंबित व आवश्यक कामे प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही दिली. देवस्थानच्या विकासासाठी महानगरपालिका स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
























