Monday, February 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भीषण अपघात; मोबाईल कॉलवरून मृताची ओळख

तरुण भारतbyतरुण भारत
February 9, 2026
in crime
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे–आहेरवाडी मार्गावरील कोरे वस्ती परिसरात शुक्रवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी पहाटे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमनाथ हिरू चव्हाण वय २५, रा. मद्रे, ता. दक्षिण सोलापूर असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ चव्हाण हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान मद्रे–आहेरवाडी रस्त्यावरील धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा भीषण अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात इतका गंभीर होता की मृत तरुणाचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाल्याने सुरुवातीला त्यांची ओळख पटविणे कठीण झाले.

दरम्यान, मृताच्या खिशात असलेल्या मोबाईलवर आलेल्या कॉलमुळे ओळख पटण्यास मदत झाली. मद्रे गावचे पोलीस पाटील अनिल हक्के यांनी मोबाईलवर संपर्क साधून खात्री केल्यानंतर मृताची ओळख सोमनाथ चव्हाण अशी निश्चित करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस. व्ही. कुवर व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत सोमनाथ यांना सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

सोमनाथ चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, बहीण व भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकाली मृत्यूने मद्रे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

Post Views: 36
Previous Post

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, मतमोजणीसाठी १२०  अधिकारी, कर्मचाऱ्यांची ‍नियुक्ती 

Next Post

विहिरीत पडलेल्या दोन घोणस सापांना मिळाले जीवदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विहिरीत पडलेल्या दोन घोणस सापांना मिळाले जीवदान

ताज्या बातम्या

ताज्या घडामोडी.#bjp #viral #marathinews #solapurnews #viral #aajsolapur #maharashtranews #livenews

February 9, 2026

अकलूजमध्ये भाजपचा झेंडा फडकला…#भाजपा #bjp #viral #public #bjpindia #modi #devendrafadnavis

February 9, 2026

माढा तालुक्यातील भोसरी गटातून राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी विजयी झाल्या आहेत #public #viral #solapur

February 9, 2026

गंगाधर बिराजदार यांची इस्त्राईल शेती अभ्यास दौऱ्यासाठी निवड; ९ ते १९ फेब्रुवारी दौरा

February 9, 2026

गण गण गणात बोते सोरेगावमध्ये भक्तीचा महोत्सव : श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन उत्साहात साजरा

February 9, 2026

गोरक्षकावर हल्ला; कसाईवर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करा

February 9, 2026

मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा राखली कायम

February 9, 2026

विविध संत आणि देवांच्या अभंगांनी रंगली अभंगवाणी

February 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0668876

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697