सांगोला – मेथवडे (ता.सांगोला) येथील सह्याद्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी, कळंब, इंदापूर व लँगबसटेक युनिव्हर्सिटी न्यू जर्सी, अमेरिका, आफ्रिका, आशिया, स्कॉलर्स ग्लोबल नेटवर्क लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल समिट ऑन फ्युचर रेडी फार्मसी, इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट सायन्स या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभाग घेऊन सना जमादार या विद्यार्थिनीच्या सादरीकरणाने तृतीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी सन्मान केला. तसेच एम.फार्मसी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी वृषाली सरतापे, अनुप कुंभार, आकांक्षा झाडबुके व एम.फार्मसी प्रथम वर्षाचे श्रुती देशमुख, शुभांगी चव्हाण, सानिका पुजारी, शीतल खताळ या विद्यार्थ्यांनी केमिकल मॉलिक्युलर डॉकिंग व फायटोकेमिकॅल स्टडी अँड हर्बल टॅबलेट या विषयावर आपले सादरीकरण करत या आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी बनवलेले पोस्टर व माहिती सादरीकरण याचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ.ए.एम.तांबोळी, डॉ.एन.ए.तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.

























