पंढरपूर – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘बारामती ॲग्रो कंपनी’च्या माध्यमातून येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दोन ॲम्बुलन्स भेट स्वरुपात सुपुर्त करण्यात आल्या. मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी बारामती येथे जावून या भेट स्वरुपात दिलेल्या ॲम्बुलन्सचा स्विकार केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मीत निधना संपुर्ण राज्य हळहळले. दरम्यान अजित पवारांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘बारामती ॲग्रो कंपनी’च्या माध्यमातून येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी सेवा म्हणून दोन ॲम्बुलन्स देण्यात आल्या.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या ॲम्बुलन्स मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्याकडं सुपूर्द करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य लोकांसाठीच काम केलं, दादांचं हेच कार्य आणि विचार यातून प्रेरणा घेऊन ‘बारामती ॲग्रो कंपनी’च्या माध्यमातून या ॲम्बुलन्स मंदिर समितीला देण्यात आल्या.
दरम्यान वर्षभर पंढरपूरला श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांनाही या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून निश्चितच चांगली सेवा देता येईल असा विश्वास देखील यावेळी बारामती ॲग्रो कंपनीच्या विश्वास्तांकडून व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार , योगेश रणदिवे आदींसह बारामती ॲग्रो कंपनीचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
























