माळशिरस : येथील गोपाळराव देव प्रशाला व ज च आगाशे कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच इथे केंद्र सुरू होत असून आज परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड मिलींद कुलकर्णी कार्यवाहक राम दोशी संचालक संतोष कुलकर्णी प्राचार्य धनंजय केसकर उपप्राचार्य जानकर व दीक्षित मॅडम यांनी स्वागत केले
तालुक्यात अकलूज कॉलेज ११४८ दाते प्रशाला नातेपुते ४८५ मॉडेल विविधांगी प्रशला माळीनगर ३०६ महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रशाला वेळापूर ३२० बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर २४३ शंकरराव मोहिते इंग्लिश स्कूल धवल नगर अकलूज ३२५ श्रीराम विद्यालय पानीव ३४१ विवेकानंद प्रशाला माळशिरस १७६ शिवशंभो प्रशाला कन्हेर ६१६सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय नातेपुते ३२२ जाधव वाडी ६४४ भिवाई प्रशाला पिरळे ५०५ लोकविकास विद्यालय वेळापूर २१५ गोपाळराव देव प्रशाला माळशिरस २१६ आगाशे प्रशाला बोरगाव ३४३ असे ६२०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तालुक्यातील १५ परीक्षा केंद्रातून ६ हजार २०५ विद्यार्थी १२ वि ची परीक्षा देणार असून परीक्षेची तयारी झाली असून आज दिनांक दहा फेब्रुवारी पासून परीक्षा सुरू झाली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी तथा परिरक्षक सुषमा महामुनी यांनी दिली .
























