माढा : भारत आणि अमेरिका कार्यक्षेत्र असलेल्या इन्साईट सक्सेस या संस्थेचा मानाचा प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार दारफळ सीना येतील प्रसिद्ध चित्रकार रत्नदिप बारबोले यांना काल जाहीर झाला.
दारफळ सीना येथील प्रसिद्ध चित्रकार रत्नदिप बारबोले यांना मागील महिन्यात “प्राईड ऑफ महाराष्ट्र २०२६ या पुरस्काराचे नामांकन मिळालं होतं.आज तो मानाचा पुरस्कार रत्नदिप बारबोले यांना जाहीर झाला आहे..! भारत आणि अमेरिका मध्ये कार्यरत असलेल्या इन्साईट सक्सेस या संस्थेचा हा पुरस्कार असून येत्या 26 फेब्रुवारी ला कलानगरी पुणे येथे रेडिसन ब्ल्यू या हॉटेल मध्ये दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल..! आज पर्यंत देशविदेशात चित्रकार बारबोले यांचे चित्रप्रदर्शन झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रिय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार बारबोले यांना मिळाले आहेत. त्याच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल बारबोले यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
आज पर्यंत केलेल्या कलेच्या सेवेची ही पोहोच पावती आहे.आपल्या सर्वांच्या सदिच्छा आशीर्वाद यामुळे हे शक्य होत आहे. सर्व कलारसिक मायबाप आपले मनापासुन आभार.
….चित्रकार रत्नदिप बळीराम बारबोले.

























