सोलापूर : भारतातील लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी’ (ISD), दिल्ली या संस्थेच्या कमिटी सदस्यांनी नुकतीच सोलापूर शहराला भेट दिली.
या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची रचना, राजकीय समीकरणे आणि सामाजिक स्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारसंघ रचना: सोलापूर लोकसभा आणि जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांची भौगोलिक व्याप्ती, मतदारसंघातील मतदारांचे प्रभावी संघटन आणि त्यांचा कल समजून घेणे,जिल्ह्यातील विविध जाती-धर्मांची समीकरणे आणि त्यांचा राजकारणावरील परिणाम,
युवा नेत्यांशी संवाद या विषयावर चर्चा झाली.
यावेळी सोलापुरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या तरुणांशी कमिटी सदस्यांनी संवाद साधला. या चर्चेतून सोलापूरच्या विकासाचे प्रश्न आणि भविष्यातील राजकीय नेतृत्वाची गरज यावर मंथन झाले.
या बैठकीला सोलापूरचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार, राज सलगर, सुहास कदम, नगरसेवक सत्यजीत वाघमोडे,राम जाधव, सागर शितोळे, निशांत साळवे, संजय हरिजन, सर्फराज शेख आदी उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन आतिश बनसोडे यांनी केले होते. नगरसेवक विनोद भोसले यांनी सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला.























