सोलापूर – जनविकास क्रांतीसेना पक्षाची सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीतील निकाल व पक्षाच्या पुढील कामकाजाचा आढावा बैठक दिनांक 11 फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी 11 वाजता पक्षाच्या कुचन नगर(पद्मशालीचौक)येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जनविकास क्रांतिसेनेची संस्थापक विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धीस दिली आहे
नुकतेच झालेल्या 2025/ 26 सालाच्या सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने केलेले कामकाज व महानगरपालिका निवडणुकीत ज्या उमेदवारांनी जनविकास पक्षाकडून निवडणुका लढविल्या त्यांना प्राप्त झालेले मतदान तसेच सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लागलेला निकाल या संदर्भ विचारमंथन करून पक्षाच्या पुढील कामकाजाचे नियोजन त्याचबरोबर सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध अडचणी, समस्या सोडविण्याबाबत आणि पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात दिनांक 11.2.2026 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता पक्षाचे संपर्क कार्यालय कुचन नगर (पद्मशाली चौक)येथे महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे
तरी जनविकास क्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन जनविकास क्रांतीसेनेचे संस्थापक विष्णू कारमपुरी (महाराज )यांनी केली आहे





















