सोलापूर – नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, ज्ञानेश्वर म्हेत्रे,राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले, धर्मराज बळ्ळारी, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, भाग्यश्री महाजन, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र मुलगे, काशिनाथ माळगोंडे, बसवराज तेग्गेळी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम सरस्वती मातेच्या व विज्ञान शिक्षक कै.शिवकुमार शिरुर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी यशोदा पुजारी, अनुष्का चौगुले, आदिती घुगरे, स्नेहा दासरी, दिव्या शिंदे, श्रावणी हिप्परगी, सपना कंटली व कावेरी पगडयाल आदी विद्यार्थीनीने मनोगतातून शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र मुलगे आदींनी मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे.चांगले गुण मिळवून आई-वडिलांचे व शाळेचे नाव लौकिक करण्याचे आवाहन केले . मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले, दहावीचे वर्ष हे जीवनाला कलाटणी देणारे वर्ष आहे . यापुढे गुणांवरुन कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश मिळणार आहे.म्हणून जिद्द, चिकाटी , परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वासाने यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा हंचाटे व पूर्वा रेके यांनी केले तर सृष्टी बोरामणी यांनी आभार मानले.
















