अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी आपल्या कोकण दौऱ्यात देवगड तालुक्यातील मीठमुंब्री येथील श्री स्वामी समर्थ मठास मित्रपरिवारासमवेत भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
यावेळी मीठमुंब्री श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांचा श्री स्वामी समर्थाचे प्रसाद, शाल देवून यथोचित सत्कार केला. यावेळी हडपीड श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, कोकण कट्टयाचे संस्थापक कुमार पितळे, प्रा.शिवशरण अचलेर, बाबा सुरवसे, अंकूश केत, ज्ञानेश्वर भोसले, विश्वनाथ देवरमनी, दर्शन घाटगे, सुनिल पवार, डॉ.हिरण्णा पाटील, मनोज इंगुले, सुरेश वाले सर, संदीप पंडीत, रमेश शिंदे, श्रीकांत मलवे, महेश मस्कले, तुषार मोरे, आदीत्य गवंडी, युवराज सोनटक्के, नंदकुमार कटारे, रामलिंगय्या स्वामी, समर्थ स्वामी, स्वप्निल गायकवाड, धनराज स्वामी, रजत गायकवाड, ओंकार महाडीक, भाई मांजरेकर, झुंजार पेडणेकर, स्वप्निल पिंगुळकर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – मीठमुंब्री येथील श्री स्वामी समर्थ मठात नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व विश्वस्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना छायाचित्रात दिसत आहे.























