अक्कलकोट – चिंचोळी (मै) ता. अक्कलकोट येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीपुत्र आंदेवाडी यांची निवड झाली असून सदर सोसायटी ही गेल्या पन्नास वर्षापासून माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या ताब्यात होती ती आता या निवडीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाकडे आलेले आहे.
आज अक्कलकोट येथील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात या निवडी संदर्भात विशेष सभा बोलवण्यात आलेले होते एकूण 11 सदस्य असलेल्या या सोसायटीच्या यावेळी झालेल्या निवडणुकीत लक्ष्मीपुत्र हणमंत आंदेवाडी यांना सहा मते पडली तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले सिद्धण्णा आंदेवाडी यांना एकूण पाच मते पडली आणि एका मताने लक्ष्मीपुत्र यांचा विजय होऊन चेअरमन पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
यापूर्वीचे चेअरमन श्री श्रीमंत चनबसप्पा आंदेवाडी हे मयत झाल्याने या निवडीची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ छाया रवींद्र नाटकर यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सिद्धेश्वर कुंभार यांनी काम पहिले. चेअरमन निवडीनंतर अक्कलकोट नगरपरिषद उपनगराध्यक्ष ऋतुराज (बंटी ) राठोड,नागराज कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी चिंचोळी (मै ) विकास सोसायटीचे सचिव प्रकाश पाटील यांच्यासह महेश बिराजदार, कल्याणी पाटील, शशिकांत बिराजदार, अल्लाउद्दीन चिद्री, गोपाळ आंदेवाडी, सदानंद जमादार, राजशेखर आंदेवाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.निवडीवेळी लक्ष्मीपुत्र आंदेवाडी, पिरण्णा बिराजदार, शामराव आंदेवाडी,श्रीशैल आंदेवाडी,विजयकुमार आंदेवाडी, पार्वती आंदेवाडी ही सहा मते लक्ष्मीपुत्र आंदेवाडी यांच्या बाजूने झाली तर मोनप्पा सुतार, बसण्णा बनसोडे, शंकर राठोड, मंगला बिराजदार, सिद्धण्णा आंदेवाडी ही पाच मते सिद्धण्णा आंदेवाडी यांच्या बाजूने पडून लक्ष्मीपुत्र आंदेवाडी यांची एका मताने निवड झाली.
निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनीअभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ही सोसायटी भाजपचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या गटाकडे आलेली आहे आणि स्थापनेपासून प्रथमच म्हेत्रे यांच्या ताब्यातून ही सोसायटी गेली आहे.


















