अकलूज – महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिव शंकर बाजारने सवलतीच्या दरात साबुदाणा व शेंगदाणे विक्रीस ठेवल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी ग्राहकाने केली शिवशंकर बाजार च्या सर्व शाखांवर ही सुविधा ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांची सोय झाली सुमारे दहा टन शेंगदाणा व साबुदाणा विक्री झाल्याचे समजते शंकर नगर येथे शिव पार्वती मंदिर येथे महाशिवरात्र यात्रा मोठ्या प्रमाणावर ,या पार्श्वभूमीवर येथील शंकरनगर परिसरात उपवासाच्या पदार्थांची मोठी दुकाने थाटली होती.
ग्रामीण भागात हा उपवास धरण्याचे प्रमाण खूप मोठे असते,घरोघरी आबालवृद्धांचे उपवास असल्याने उपवास पदार्थ ही मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात.त्यासाठी साबुदाणा,शेंगदाणे, भगर,खजूर,राजगिरा याच बरोबर केळी सारखी फळे ही मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात.तसेच खास या उपवासाच्या वेळी येणारी रताळी यावेळी बाजारात येत असल्याने या निमित्ताने ते ही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात.
खास या उपवासासाठी शेतकरी छोट्या प्रमाणात रताळीची लागवड करतात. या निमित्ताने रताळी चा ही भाव वाढला असून ती ४० रुपये किलो,बटाटे २५ रुपये किलो ,हिरवी मिरची १२० रुपये किलो याप्रमाणे विकले जात होते,हे विक्री करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांचे स्टॉल यशवंतनगर येथील कारखाना परिसरात लागले होते.


















