सोलापूर – विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी अबॅकस परीक्षेत उत्तीर्ण झाले. सोलापूरातील श्रद्धा इन्स्टिट्यूट मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल लेवलच्या अबॅकसची परीक्षेत शाळेतील संस्कृती उंबरजे,स्वाती लवटे,रुद्र पाटकळे, आदर्श संकण्णा हे चार विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत , खुशी फुलारी, श्रेया कोळेकर, आर्या ढंगापुरे,हरिष पाटील,आरुषी चाबुकस्वार,रोहन चाबुकस्वार, अनविता संकण्णा हे सात विद्यार्थी तिसऱ्या श्रेणीत व उर्वरित सर्व २१ विद्यार्थी चौथ्या श्रेणीत स्थान प्राप्त करुन यश संपादन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्वाती शहा व सुरेखा डबरे यांचे मार्गदर्शन लाभले. सुरेखा डबरे यांना बेस्ट स्कूल टिचर अवार्ड मिळाला. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, ज्येष्ठ शिक्षिका वैशाली गुजर, लक्ष्मण कांबळे, हणमंत कुरे, श्रेयस बिराजदार आदींच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीला वाव देण्यासाठी, एकाग्रता सुधारण्यासाठी ,बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी, गणित विषयात एक्सपर्ट होण्यासाठी, तर्क शक्तीत वाढ होण्यासाठी अबॅकस सारख्या परीक्षेची काळाची गरज बनली आहे.पालकांनी अशा स्पर्धांत्मक परीक्षेला आपल्या पाल्यांना बसण्यासाठी प्रेरणा देण्याचे आवाहन केले.






















