सोलापूर – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत जुळे सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालयाचे शाबाद नदाफ व निखिल चव्हाण यांनी अनुक्रमे 70 व 75 किलो गटातून प्रथम क्रमांक पटकाविला.
छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये झालेल्या या स्पर्धेत 15 महाविद्यालयाच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.नितीन मोटे यांनी केले. यावेळी सोलापूर विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर प्रा सचिन गायकवाड, विद्यापीठ स्पोर्ट्स कौन्सिलचे सचिव प्रा. विशाल होनमाने, डॉ. शिवानंद तोरवी, प्रा. नंदकिशोर देशपांडे, डॉ आनंद धवन, निवड समितीचे प्रमुख धनंजय देशमुख, डॉ. अशोक पाटील, डॉ. किरण चोकाककर, डॉ. बारस्कर, प्रा.डिसले आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे सचिव प्रा.संतोष गवळी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.अमोल वाघमोडे यांनी केले. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी आभार मानले.
सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव प्रमोद काटे, पालिकेचे माजी क्रीडा अधिकारी नजिर शेख, गोरख गडसिंग आणि शकील बडेकर यांनी पंच म्हणून कार्य केले.
अंतिम निकाल (प्रथम तीन) : 60 किलो- योगेश जाधव (शिवाजी, बार्शी), दिप्तराज साळुंखे (कोर्टी इंजीनियरिंग, पंढरपूर), सुशांत वाघमारे (एच. एन. कॉमर्स, सोलापूर).
65 किलो – व्यंकटेश काळे (छत्रपती शिवाजी नाईट, सोलापूर), शेख हजरतअली (दयानंद, सोलापूर), वैभव जाधव (बी.पी. सुलाखे कॉमर्स, बार्शी).
70 किलो- शाबाद नदाफ (वसुंधरा कला महाविद्यालय, जुळे सोलापूर), संकेत विभुते (देशभक्त संभाजीराव गरड, मोहोळ), दीपक फरतडे (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज).
75 किलो -निखिल चव्हाण (वसुंधरा कला महाविद्यालय), रमेश दोडमणी (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज).
80 किलो- लक्ष सुरवसे (उमा, पंढरपूर), अथर्व अनगुडे (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज), सुमित जाधव (व्ही. जी. शिवदारे, सोलापूर).
85 किलो- ओम ज्ञानेश्वर भिवटे (के.बी.पी., पंढरपूर). 90 किलो : शेख साहिल ( वालचंद आर्ट्स सायन्स, सोलापूर).





















