सोलापूर – टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुरुसिध्दाप्पा बिराजदार व उपाध्यक्ष सरपंच भौरव्वा कोळी होते. मल्लिकार्जुन बगले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. होटगी बीटचे विस्तारधिकारी सैपन आळगी व केंद्रप्रमुख शांतप्पा सदरखेड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सिद्धाराम मधुरे , सिद्धाराम बगले, दिलीप चांदकवटे, लक्ष्मण कुंभार , डॉ. उमेश सुरळे ,सुधाकर बिराजदार, रविंद्र बगले ,बिराप्पा लातूरे, संतोष मधुरे , रमेश पदमगोंडे, श्रीशैल बगले, श्रीशैल कलशेट्टी ,दयानंद दूधभाते ,दयानंद कलशेट्टी, शिवानंद मगी , शिवशरण दुधभाते आदी उपस्थित होते . यावेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवर ,ग्रामपंचायत सदस्य ,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व पालक उपस्थित होते.


















