अक्कलकोट – सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पिंगुळी कुडाळ येथील निवासी राऊळ महाराजांचे जीवन कार्य आध्यात्म व सेवेतून व्यतीत झाले आहे. शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे श्री स्वामी महाराज यांच्या कार्यकालानंतर कोकणातील राऊळ महाराज यांचे जीवन कार्य हे भाविकांना प्रेरणास्त्रोत आहे. या पाश्वभुमीवर राऊळ महाराजांचे जीवन कार्य संत महात्म्यांच्या दर्जाचे असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच पार पडलेल्या कोकण दौर्यावर पहिल्या दिवशी प्रथमेश इंगळे
व मित्र परिसरासह पिंगुळी कुडाळ येथील सद्गुरु राऊळ महाराज यांच्या मंदीरास भेट देवून राऊळ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी राऊळ महाराज देवस्थानच्या वतीने विश्वस्त विनायक पणशीकर यांनी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांचा राऊळ महाराज यांची दिव्य प्रतिमा, शाल, श्रीफळ देवून सन्मान केला. यावेळी महेश इंगळे बोलत होते. यावेळी श्री.
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनेही राऊळ महाराज मंदीर समिती पदाधिकाऱ्यांचा अक्कलकोट निवासी श्री.स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी हडपीड श्री स्वामी समर्थ मठाचे सचिव नंदकुमार पेडणेकर, अध्यक्ष प्रभाकर राणे, कोकण कट्टयाचे कुमार पितळे, महेश इंगळे मित्र परिवार सदस्य ज्ञानेश्वर भोसले, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, अंकूश केत, मेजर अमोल माने, मनोज इंगुले, सुनिल पवार, नंदकुमार कटारे, रामलिंगय्या स्वामी, डॉ.हिरण्णा पाटील, संतोष पराणे, कुमार हत्तूरे, रमेश शिंदे सर, स्वप्निल गायकवाड, सुरेश वाले, बाबा सुरवसे, संदीप पंडीत, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, महेश मस्कले, लखन सुरवसे, अरूण शिंदे, बंटी नारायणकर, शंकर मलवे आदींसह अन्य उपस्थित सदस्य व भाविक भक्त उपस्थित होते.






















