सोलापूर – मागील 4 वर्षा पासुन कुर्ड परिसरात दहशत निर्माण करणारा मोका सारख्या गुन्हयातील दरोडेखोराच्या ग्रामीण पोलोसानी मुसक्या आवळुन जेरबंद केले आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना कुई ता. माढा येथील राहणारा कुख्यात सराईत गुन्हेगार कुकण उर्फ कृष्णा काळुराम शिंदे हा त्या परिसरामध्ये सामान्य लोकांना वेठीस धरुन लुटमार करणे, लोकांना खोटया गुन्हयात अडकावाण्याची धमकी देवुन पैसे उकळने या सारखे गंभीर कृत्य करत असले बाबत तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या पार्श्वभुमिवर त्याचा योग्य तो बंदोबस्त करुन कारवाई करणेकरीता पोलीस अधीक्षक यांनी संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना सुचना दिल्या होत्या.
सपोनि विजय शिंदे व त्यांचे पथक कुर्डु ता. माढा परिसरात आरोपी कुकण उर्फ कृष्णा काळुराम शिंदेची माहिती घेत असताना, गोपनीय बातमीदारा मार्फत आरोपीचे मागे पोलीस असल्याचे माहिती मिळाल्याने तो त्या परिसरात न राहता कुर्डु येथुन नालासोपारा वसई विरार येथे गेला अडल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. तो मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय कार्यक्षेत्रातील पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत धानीवबाग नालासोपारा येथे असल्याचे समजले. त्यावरुन पथक नालासोपारा वसई विरार येथे जावुन तो राहत असलेल्या ठिकाणची माहिती काढुन सी.आय.यु. युनिट-4, मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय यांची मदत घेवुन माहिती काढली. तो त्या ठिकाणी भाडयाने रुम घेवुन राहत असल्याची माहिती मिळाली. त्या भागात पोलीस पथकाने 12 तास सापळा लावुन शीताफिने पकडले.
आरोपीला पुढील कारवाई करीता कुडुवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास कुर्डेवाडी पोलीस ठाणे करीत आहे.
ही कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, अंजना कृष्णा व्ही. एस, सहा., संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पथकातील श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, रवि माने, आबा मुंढे, व्यकंटेश मोरे, अश्वीनी गोटे, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे, अन्वर अत्तार, मनोज राठोड, चापोना समीर शेख, तसेच सी.आय.यु. युनिट-4, मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय कडील पोलीस निरीक्षक बडाख, सहा. पोलीस अधीकारी प्रशांत गांगुर्डे, दत्ता सरख, शिवाजी पाटील, संदिप शेरमले, रविंद्र कांबळे, धनंजय चौधरी यांनी केली.



















