Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शेळगी परिसरात श्री संत रविदास बहुद्देशीय सामाजिक संस्था, शेळगी यांच्या वतीने गुरु रविदास यांची ६४९ वी जयंती १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या जयंती उत्सवात धार्मिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.

     १४ फेब्रुवारी रोजी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. कल्लप्पा महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मुलानी, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, ह.भ.प. बळीराम जांभळे महाराज, संस्थापक अध्यक्ष मेजर वसंत सपताळे आणि ह.भ.प. मंगेशजी कुलकर्णी यांच्या हस्ते महापूजन करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर भजन, कीर्तन, पारायण व महाप्रसादाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

         १५ फेब्रुवारी रोजी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात पदोन्नती मिळविलेल्या मान्यवरांचा व सोलापूर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील गरजू महिलांना साड्यांचे वाटप करून जयंतीची सांगता करण्यात आली. याउपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक सेवेची जोड मिळाली. कार्यक्रमास वैशाली कोनापूरे, प्रकाश बिराजदार, अशोक लामतुरे, केदार पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या सचिवा जयश्री सपताळे व खजिनदार वैशाली गायकवाड यांनी प्रस्तावना केली.

“मन चंगा तो कठौती में गंगा” या उक्तीचा संदर्भ देत मेजर वसंत सपताळे यांनी मन शुद्ध असेल तर सर्व कार्य सफल होते, असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत विचारांची जयंती साजरी करणारी ही चळवळ प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मारुती जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप कांबळे यांनी केले. उत्सव यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

Post Views: 38
Previous Post

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

Next Post

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान – प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान - प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आई प्रतिष्ठानचे आता वटवृक्षात रूपांतरमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार.#public

February 19, 2026

शिवलक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज दत्त पादुकांचे पूजन करण्यात आले.#public

February 19, 2026

उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू जिल्ह्यात 64, हजार 454 विद्यार्थी देणार परीक्षा.#public #10thmaths

February 19, 2026

झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा सोलापुरात शिवजन्मोत्सव साजरा नागरिकांची प्रचंड गर्दी. #public #marathinews

February 19, 2026

त्या मुलीचा व्हिडिओ जबरदस्तीच – पडळकर #viral #marathinews #aajsolapur #maharashtranews

February 19, 2026

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान – प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

February 19, 2026

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

February 19, 2026

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0687070

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697