अक्कलकोट – तालुक्यातील तोडून येथे लोकनेते कैलासवासी वहीदपाशा पिरजादे पाटील प्रतिष्ठान तर्फे आरोग्य तपासणी शिबिर व वंचितांना चादर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम हा दिनांक १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला लोकनेते वहीदपाशा पिरजादे पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीरपाशा पिरजादे पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी शंभर गरजू वंचितांना चादरींचे वाटप करण्यात आले. तसेच १२० रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. या कार्यक्रमास अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड , डॉक्टर निखिल क्षीरसागर , डॉक्टर नीरज जाधव , डॉक्टर बाबासाहेब सुलतानपुरे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष रब्बा ,सुरेखा पाटील , संतोष राठोड , रतन राठोड , डॉक्टर शैलजा माळी , डॉक्टर सुचिता जवळकर , डॉक्टर प्रणिता लोकापुरे , सिद्धाराम गांगोंडा , शिवानंद बिराजदार , आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचा सत्कार पिरपाशा पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास शितल जाधव ,ललिता चिंचुरे ,मनीषा सलगर ,उज्वला फडतरे ,विनोद ढंगे , शिवानंद चितली, गंगाराम राठोड , लक्ष्मण कोळी , सिद्धाराम सबाळ , ईरण्णा कांगळे , गणेश कांबळे , गुगी नबीलाल श्रीशैल रब्बा आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीशैल रब्बा यांनी केले तर आभार विश्वनाथ चव्हाण यांनी मानले.























