अक्कलकोट – महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने मुबंई वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा – 5.0’ या कार्यक्रमात अक्कलकोट नगरपरिषदेला महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचे पारितोीषिक पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यानां प्रदान करण्यात आले .
भूमी घटकास विशेष पारितोषीक व उंच उडी प्रकारात पारितोषीकही प्रदान करण्यात आले . सन्मानचिन्ह, मानपत्र आणि सहा कोटी पन्नास लाख रुपयांच्या धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते .
आ . सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनामुळे अक्कलकोट नगरपरिषदेचे नागरिक, प्रशासनाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले. असल्याचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशट्टी म्हणाले .
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम . आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानसभा अध्यक्ष . राहुल नार्वेकर, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, राज्याच्या मुख्य सचिव . जयश्री भोज, आयुक्त प्रवीण देवरे, राज्यपाल सहसचिव .राममुर्ती, आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार बहाल करण्यात आला .
पुरस्कार स्विकारताना मुख्याधिकारी. रमाकांत डाके, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, मध्य मंडलचे अध्यक्ष . प्रदिप पाटील, . प्रशांत भगरे, विशाल चव्हाण, . नितीन शेंडगे, . भागवत पवार, . शुभम माने आदि उपस्थित होते.
























