सोलापूर – देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून सोलापूर युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
“भारत मंडपममध्ये विदेशी पाहुण्यांसमोर असभ्य वर्तन करून भारताची जागतिक स्तरावर नाचक्की करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या ‘चड्डी-बनियान गँग’ने केला आहे. हे वर्तन म्हणजे देशप्रेम नसून एक प्रकारचा देशद्रोहच आहे. या लाजिरवाण्या प्रकाराबद्दल काँग्रेस नेत्यांनी देशाची जाहीर माफी मागायला हवी अशी प्रतिक्रिया युवा सेना शहर सचिव समर्थ बिराजदार यांनी दिली.
या वेळी सामी मौलवी ,सोशल मीडिया शहर प्रमुख राज मिसाळ, धनंजय कारंडे, अभिषेक उजागरे, आकाश कोळी, अर्जुन बंडगर यांसह मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते.



























