Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

तरुण भारतbyतरुण भारत
July 22, 2026
in crime
0
बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – शहरातील बीआयटी कॉलेजसमोरील रस्त्यावर मंगळवारी (दि. २१ जुलै) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात शिक्षक राजेश मोहन सोनवणे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा ११ वर्षीय मुलगा तेजस ऊर्फ स्वराज सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुहेरी मृत्यूमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बीआयटी कॉलेजसमोरील रस्त्यावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने दोनजणांना धडक दिल्याची माहिती निर्भया पथकाचे कर्मचारी बाबासाहेब घाडगे व डायल-११२ पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी राजेश सोनवणे यांना तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी झालेल्या तेजस ऊर्फ स्वराज याला पुढील उपचारासाठी जगदाळे मामा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरु केला असता अपघातस्थळापासून काही अंतरावर वाहनाची नंबर प्लेट आढळून आली. तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात करणारे वाहन मारुती सुझुकी डिझायर (क्र. MH-13 EX-2282) असल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती हे वाहन महेश नानासाहेब काजळे (रा. अरणगाव, ता. बार्शी) याच्या ताब्यात असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीसह अपघातग्रस्त वाहन येरमाळा परिसरातून ताब्यात घेतले आहे.
मयत राजेश सोनवणे यांचा मोठा मुलगा सक्षम सोनवणे (वय १९) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील व लहान भाऊ रस्त्याच्या कडेला पायी घरी जात असताना भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या डिझायर कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरुन पलायन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपी महेश नानासाहेब काजळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 106(1), 125(B) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 134 (अ), (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.
Post Views: 18
Previous Post

बार्शी तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न; तरुणावर पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल

Next Post

एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील अतिसाराचा एक रुग्ण अत्यवस्थ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील अतिसाराचा एक रुग्ण अत्यवस्थ

ताज्या बातम्या

एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील अतिसाराचा एक रुग्ण अत्यवस्थ

July 22, 2026
बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

July 22, 2026

बार्शी तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न; तरुणावर पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल

July 22, 2026

भव्य शालेय दिंडी व विठ्ठल रुख्मिणी वेशभूषा स्पर्धा २०२६ #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0991885

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!