अकलूज – शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल ने अल्पावधीतच चांगले नाव ल लौवकिक मिळवले आहे या स्कूल मधील विद्यार्थ्यांना सैनिक शाळेत प्रवेश मिळावा तसेच केंद्रीय नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी तयारी करून घेतली जाईल त्यासाठी खास अकॅडमी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शितल देवी मोहिते पाटील यांनी दिली
शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा स्मृतिभवन या ठिकाणी दिमाखात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेब आणि श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमांना अभिवादन करून शिवरत्न उत्सवाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाने झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस पं. स. गटविकास अधिकारी मा.श्री रघुनाथ भगवान पांढरे प्रसिद्ध रीलस्टार आर. जे.सागर भालेराव हे होते.
त्याचप्रमाणे मंचावर ताराराणी कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा माननीय कु ईशितादेवी धैर्यशील मोहिते पाटील शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री.धर्मराज दगडे सर, सदस्य मा श्री नितीन बनकर सर, शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे चेअरमन माननीय श्री रामकृष्ण काटकर सर तसेच सदस्य मा श्री एच डी भोसले सर, मा श्री शंकर गायकवाड सर, मा श्री शिवदत्त नारायणकर सर, यशवंत नगर केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री विठ्ठलराव काळे सर, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा यशवंत नगर चे मुख्याध्यापक माननीय श्री बंडू खडतरे सर, एस एम पी स्कूल चे प्राचार्य मा श्री अल्बर्ट थारकन सर, शिवरत्न स्कूलच्या प्रिन्सिपल मा सौ बिनो पाऊलसो मॅडम शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री सचिन बोरावके सर, शिवरत्न अकॅडमी चे प्रमुख माननीय श्री राजकिरण माने देशमुख सर, मॅथ्स ओलंपियाडच्या संचालिका माननीय सौ मेघा घुले मॅडम विद्यार्थ्यांनी विविध विषयावर नाटिकांसह नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या नृत्यासोबतच महिला पालकांनी देखील नृत्याचा आनंद घेतला.
यावेळी शैक्षणिक, कला आणि इतर स्पर्धापरीक्षा मध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. स्कूलचे प्रिन्सिपल मा. श्री जितेंद्र माने देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून सुरुवातीला माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील साहेब व शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मा सौ शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद देत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्याचे प्रयत्न केले जातात हे आवर्जून सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026- 27 साठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले. शिवरत्न उत्सवामध्ये छोटा गट मोठा गट व इयत्ता पहिली ते आठवीच्या 248 विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर आपला कलाविष्कार सादर केला. स्वागत गीत, शेतकरी गीत, राजस्थानी गीत, गुजराती गीत, कांतारा, बॉलीवूड सॉंग, मराठी गीत व इतर गीतांनी प्रेक्षकांना टाळ्यांची दाद मिळाली शिवरत्न उत्सवामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित शाळा मराठी या गाण्याने सर्वच उपस्थित त्यांची मने जिंकली.
संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन इयत्ता आठवीतील कु.ज्योती औदुंबर सावंत आणि कु. प्रणाली श्रीनिवास मुळे या दोघींनी केले.























