सोलापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या जोड बसवण्णा चौक येथील महानगरपालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक सहा या शाळेला आयडीबीआय बँक अक्कलकोट रोड शाखेने सीआरएस फंडातून पाच संगणक भेट दिले आहेत. या संगणक कक्षाचे उद्घाटन आयडी बीआय बँकेचे मॅनेजर जितेंद्र वेद यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आकाश पात्रीकर, सोलापूर श्रद्धा इन्स्टिट्यूटचे संस्थापक स्वाती शहा, पराग शहा, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक संतोष बुलबुले, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी लामतुरे हे उपस्थित होते. आयडीबीआय बँकेच्या सीआरएस फंडातून पाच संगणक शाळेला भेट दिल्याने सदरच्या संगणक कक्षामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे उपयोग करून अध्ययन करता येईल संगणकामुळे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी वर्ड, पावर पॉइंट, एक्सेल, पेंट करणे अशा गोष्टी शिकतील त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गोडी निर्माण होईल असे असे मत आयडीबीआय बँक मॅनेजर जितेंद्र वेद यांनी व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक अश्विनी लांबतुरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक आनंद सामल यांनी केले. आभार प्रीती लवंड याने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका स्वाती शिंदे, प्रेमा कोरे, संगणक शिक्षिका अरुणा कदम, साक्षी, प्रसन्नकुमार देऊनूर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























