सोलापूर – स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्यावतीने 1 चारचाकी वाहन, 2 मोटारसायकलींसह शेळ्या चोरीचे 18 गुन्हे करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे.
वाढत्या शेळ्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे तीन इसम 1 चार चाकी गाडी व 2 मोटारसायकल घेऊन मोहोळ – पोखरापुर रोडवर थांबली असल्याचे गोपनीय बातमीदार यांनी माहिती दिली त्यावरून सहा पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या टीमने तीन इसमांना वाहनांसह ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमाकडे प्राथमिक चौकशी केली असता सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सोलापूर तालुका या भागांत शेळ्या व मोटारसायकल चोरीचे 18 गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, सपोफो. प्रकाश कारटकर, पो हवा सलीम बागवान, विजय भरले, शशी कोळेकर, विरेश कलशेट्टी, धनराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील, प्रमोद शिंपाळे, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, राहुल दोरकर, हरीष थोरात व चालक दिलीप थोरात यांनी केली आहे
























