Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“भांडवलासोबत कायद्याची जोडच यशस्वी व्यवसायाची खरी गुरुकिल्ली”

तरुण भारतbyतरुण भारत
February 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी : व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल जितके आवश्यक आहे, तितकेच व्यवसायास लागू होणाऱ्या कायद्यांचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माननीय अ‍ॅड. रणजीत काजळे यांनी केले.

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी व अंतर्गत मूल्यमापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास उपक्रमाच्या चौथ्या दिवशी “उद्योजकता आणि व्यवसाय कायदा” या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनात अ‍ॅड. रणजित काजळे यांनी विद्यार्थ्यांना केवळ कायद्याची तांत्रिक भाषा न सांगता, व्यवसाय सुरू करताना कोणते कायदे लागू होतात, कायदे पाळल्यास व न पाळल्यास काय परिणाम होतात, याची सखोल व उदाहरणांसहित माहिती दिली.

त्यांनी विशेषतः कंपनी कायदा, ग्राहक संरक्षण कायदा तसेच इतर व्यावसायिक कायद्यांची माहिती देत, व्यवसाय करताना कायद्याचे पालन केल्याने होणारे फायदे स्पष्ट केले. आपल्या प्रत्यक्ष अनुभवातील काही प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही हे मार्गदर्शन मनोभावे ऐकून घेतले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, वाणिज्य विभाग प्रमुख के. बी. चपटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता चव्हाण यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रियंका गायकवाड यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन साक्षी माने यांनी केले.

उद्योजकता विकासाच्या या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत असून, चौथ्या दिवशी व्यवसाय विषयक कायद्यांवर झालेले सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या भावी उद्योजकीय वाटचालीस नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे.

Post Views: 45
Previous Post

शेळ्या चोरीचे 18 गुन्हे करणारी टोळी जेरबंद

Next Post

विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूल येथे ‘अंगत-पंगत’ नाईट कॅम्प उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूल येथे ‘अंगत-पंगत’ नाईट कॅम्प उत्साहात

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914510

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697