दक्षिण सोलापूर – इतर मागासवर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, मुलामुलीचे वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे .
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी, मुलां/मुलीचे शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेकरीता शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये बी.ए./बी.कॉम./ बी.एस्सी. अशा 12 वी नंतरच्या बिगरव्यवसायिक/व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्हयात मुला/मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवूनही अद्याप सोलापूर जिल्हयातील रिक्त जागा दिसून येत आहेत, सोलापूर जिल्हायातील प्रथम, व्दितीय, तृतीय, व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्श्यात येत आहे. वसतिगृह आधार व स्वयंम योजनेकरीता https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याची प्रक्रिया दि.25 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. तरी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गरजू व पात्र विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक संचालक, गणेश सोनटक्के यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण, कार्यालय 4 था मजाला, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा.
वेळापत्रक पुढील प्रमाणे-
बी.ए./बी.कॉम/बी.एससी. अशा 12 नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यवसायिक व अव्यसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करावयाचा कालावधी- दि.25 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 –निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिध्द करणे दि.11 मार्च 2026 – निवड यादीनुसार अंतिम मुदत दि.12 फेब्रुवारी 2026 ते दि. 20 मार्च 2026
























