सोलापूर – अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या वतीने पाचगणी येथे झालेल्या “संजीवन एआयएफएफ ब्लू क्यूब्स फुटबॉल लीग-२०२६” मध्ये येथील समर्थ क्रीडाभारती फुटबॉल अकॅडमीने ८ व १२ वर्षाखालील गटात विजेतेपद व १० वर्षाखालील गटात उपविजेते पटकाविले
मुंबई, पुणे, दौंड आणि पाचगणी यांसारख्या शहरांतील दिग्गज संघांचा पराभव करत अकॅडमीच्या ही कामगिरी केली. ८ वर्षांखालील गटात उपांत्य फेरीत संजीवन प्रायमरी स्कूल (पाचगणी) विरुद्धचा सामना २-० ने जिंकला. श्रेयस देवकर व पीयूष कीर्तीवार यांनी प्रत्येकी १ गोल केला.
अंतिम फेरीत यशोदा पब्लिक स्कूलविरुद्ध ३-० ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. श्रेयस देवकर याने अप्रतिम कामगिरी करत हॅट्ट्रिक साधली.
१२ वर्षांखालील गटातील उपांत्य सामन्यात दौंड फुटबॉल अकॅडमीचा ३-० ने पराभव केला. यात ओमकार बाके (२ गोल) व निखिल वाघमारे (१ गोल) यांनी विजय सुकर केला. ‘इंडिया रश सॉकर क्लब’ (मुंबई) सारख्या तगड्या संघाविरुद्धचा अंतिम सामना १-१ ने बरोबरीत सुटला. पेनाल्टी स्ट्रोकमध्ये बाजी मारली. यात युवराज उमदी व विघ्नेश पवार यांचा खेळ उत्कृष्ट झाला.
१० वर्षांखालील गटातील उपांत्य सामन्यात
पंचानन फुटबॉल क्लब साताराविरुद्ध २-० ने विजय मिळविला. श्लोक लोंढे व हानगल यांनी प्रत्येकी १ गोल नोंदवला. न्यू एरा स्कूलविरुद्धचा अंतिम सामना अटीतटीचा झाला आणि पेनाल्टी स्ट्रोकमध्ये उपविजेतेपद मिळाले.
या यशात प्रशिक्षक अजय, सुमित, अमित, बंडगर आणि क्रीडा भारती अकॅडमीचे प्रमुख राजेश करमरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उज्ज्वल मलजी, विवेक मिस्किन आदी उपस्थित होते.
विजेत्या खेळाडूंचा सोलापूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा भारती सोलापूरच्या वतीने डॉ. विलास हरपाळे व प्रतीक तडवळकर यांनी ज्ञानेश्वर मॅकल यांचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण उपाध्ये यांनी केले.
—-
वैयक्तिक गौरव
श्रेयस देवकर: सर्वोत्कृष्ट खेळाडू (८ वर्षांखालील गट), श्रेयस पाटील: सर्वोत्कृष्ट खेळाडू (१० वर्षांखालील गट). विशेष सत्कार: अमित ऐदाळे व नीरज गौडा.
—–
सहभागी यशस्वी खेळाडू:
८ वर्षांखालील गट: आरुष पाटील, आरुष गुंडे, एजाज शेख, राजवीर भिसे, शिवांश मंठ, सुरभी जाधव, विराज अपसिंगकर, पीयूष कीर्तीवार, श्रेयस देवकर.
१० वर्षांखालील गट: श्लोक लोंढे, अली शेरखान पठाण, श्रेयस पाटील, श्रेयस देवकर, शौर्य कोळी, आरोह गुंडे, हिंगोलील, कार्तिक परीट.
१२ वर्षांखालील गट: संकेत काशीद, युवराज उमदी, विघ्नेश पवार, विश्वराज पुजारी, वेदांत गायकवाड, ओंकार बाके, निखिल वाघमारे,वीर घोडके, युर्णगांशन झिमिक, आहतेशाम पटेल.























